Skip to main content

Posts

Showing posts from July, 2011
दहशतवादाचा चक्रव्यूह! १३ जुलैच्या बॉम्बस्फोटांमुळेमहानगरी मुंबईला पुन्हा एकदाआतंकवादाचा सामना करावालागला आहे . या स्फोटांनीमोठ्या प्रमाणावर जीवितहानीकेली नसली तरीही लोकांमध्येभीती निर्माण केली आणिअनेकांच्या जुन्या जखमाजागवल्या . लोकांना कायमच२६ / ११सारख्या मोठ्याघटनांची भीती वाटत राहावी ,हेच छोट्या हल्ल्यांचे एक उद्दिष्टअसते . त्या दृष्टीने सरकार आणि सुरक्षा यंत्रणेचे लक्ष्य लोकांमधली सुरक्षिततेचीभावना मजबूत ठेवणे हे असले पाहिजे . म्हणूनच याक्षणी असा प्रश्न विचारावासावाटतो की २६ / ११नंतर आपले सरकार आणि सुरक्षा यंत्रणांनी असे काय केले , जेवेगळे आहे आणि ज्यामुळे नागरिकांना अधिक आश्वस्त वाटावे ? राजकारणी गटाकडे उत्तरे नसतात , तेव्हा त्यांना दुसऱ्याच्या चुका काढण्यात स्वारस्यअसते . मुंबईचे दुर्भाग्य असे की अशा राजकारण्यांची इथे अजिबात कमी नाही !बॉम्बस्फोटाच्या आगीत प्रत्येकाने आपले हात शेकले आणि आपापले राजकारण पुढेरेटण्याचा प्रयत्न केला . कोणी बाहेरच्यांना दोष दिला तर कोणी दुसऱ्या पक्षाच्यामंत्र्यांना ! मुंबईच्या प्रतिकार क्षमतेला सगळ्यात मोठा धोका कोणता याचे उत्तरएकदम सोपे आहे