Skip to main content

Posts

Showing posts from August, 2013

दुसऱ्या संधी’साठी चीन राजी?

अमाप लोकसंख्या हे ओझे नसून श्रमबळाच्या दृष्टीने ती जमेची बाजू आहे, हा विचार चीनच्या सत्तावर्तुळात रुजत आहे. तसेच भविष्यात वृद्धांचीच संख्या कमालीची मोठी असेल त्यामुळे आर्थिक महासत्ता बनूनही हा देश जराजर्जरच ठरेल, या भीतीतून ‘घरटी एकच मूल’ या धोरणाचा फेरविचार सुरू आहे. चीनचे लोकसंख्या धोरण सध्या पुन्हा प्रसिद्धी माध्यमांमध्ये चर्चेत आले आहे. याचं कारण म्हणजे, ‘हम दो हमारा एक’ अशा कठोर भूमिकेचा चीन सध्या फेरविचार करीत असून २०१५ नंतर या धोरणात बदल होण्याची चिन्हे आहेत. निवडक आर्थिक स्तरावरील जोडप्यांना एकपेक्षा अधिक मुलाला जन्म देण्याची परवानगी नव्या धोरणानुसार लाभणार आहे. सुधारित धोरण ऑक्टोबर महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत चीनच्या लोकसंख्या धोरणावरून बराच गहजब झाला होता. या धोरणातील त्रुटी उघड होत होत्या आणि सामान्य जनतेतही त्याबद्दल वाढता असंतोष होता. my article on China's population policy and the possible changes in it was published in Marathi Daily Loksatta on 26 August 2013. Click here to read the rest of the full article.