below is my recently published article on the Arihant Submarine that was inducted in the Indian Navy, courtesy Maharashtra Times 'अरिहंत पाणबुडी': शस्त्रसज्जतेचा कळस ! २६ जुलै रोजी ' आयएनएस अरिहंत ' ही देशांतर्गत विकसित केलेली आण्विक पाणबुडी भारतीय नौदलात सामील झाली . अशाप्रकारे भारताने संरक्षण क्षेत्रात एक महत्वपूर्ण टप्पा पार केला आहे . ' अरिहंत ' पाणबुडीचे वैशिष्ट्य म्हणजे आण्विक इंधनावर चालणारी ही भारताची पहिली पाणबुडी आहे . ६ हजार टन वजनाची ही पाणबुडी ११० मीटर लांब आणि ११ मीटर रुंद आहे . ' अरिहंत ' वर १०० खलाशी आणि सैनिक राहू शकतात आणि ती एकाचवेळी ९० दिवसापर्यंत कार्यरत राहू शकते . ' अरिहंत ' ची मारक क्षमता ७०० किलोमीटर एवढी आहे . आण्विक इंधनावर चालणारी पाणबुडी असणारा भारत हा जगातला सहावा देश झाला आहे . युद्धसज्जतेच्या दृष्टिकोनातून ' अरिहंत ' भारताची आण्विक शस्त्राबाबतची विचारधारा आणखी मजबूत करते . कारण आण्विक इंधनामुळे ' अरिहंत ' ची क्षमता भारताच्या पारंपरिक पाणबुड्यांपेक्षा अनेक पटीने वाढली आहे . त्यामुळे जर भारताला एखाद्य...
perspectives, imaginations, dreams and ideas