मोहम्मद अली जिना : एक वेगळा दृष्टिकोन भारताच्या फाळणीला अनेक वर्षे झाली तरीही इतिहासाचे पुनरलेखन सुरुच आहे . मोहम्मद अली जिना यांचे स्वातंत्रा भारताच्या इतिहासात स्थान काय या विषयीचा वाद अनेक वेळा अनेका स्वरुपात समोर येतो आणि राजकीय रंग घेऊन कुठल्याही निर्णयाशिवाय संपतो . पण जाता जाता हा वाद एखादा राजकीय बळी घेतो . गेल्यावेळी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी याना जिनांची स्तुती केल्याबद्दल पक्षध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला होता . ह्या वेळी जसवन्त सिंग यांना निलंबनला सामोरे जावे लागले आहे . भारतातले राजकारण जिनावरून कितीवेळ योग्य - अयोग्याचा वाद घालत राहील आणि त्यातून नेमके काय साधेल याचा गंभीर पणे विचार करायला हवा . भारतातल्या राजकारणात जिनाना विरोध करून भारतीय राष्ट्रवाद वाढेल पण त्यामुळे आपण इतिहास बदलू शकत नाही . पण थोडासा गंभीर प्रयत्न केल्यास आपण फाळनीच्या इतिहसबाबत आपला दृष्टिकोन बदलू शकतो . आणि ह्या बदलामुळे आपल्याला भारत पाकिस्तान मधील संबंध ...
perspectives, imaginations, dreams and ideas