मोहम्मद अली जिना: एक वेगळा दृष्टिकोन
भारताच्या फाळणीला अनेक वर्षे झाली तरीही इतिहासाचे पुनरलेखन सुरुच आहे. मोहम्मद अली जिना यांचे स्वातंत्रा भारताच्या इतिहासात स्थान काय या विषयीचा वाद अनेक वेळा अनेका स्वरुपात समोर येतो आणि राजकीय रंग घेऊन कुठल्याही निर्णयाशिवाय संपतो. पण जाता जाता हा वाद एखादा राजकीय बळी घेतो. गेल्यावेळी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी याना जिनांची स्तुती केल्याबद्दल पक्षध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ह्या वेळी जसवन्त सिंग यांना निलंबनला सामोरे जावे लागले आहे.
भारतातले राजकारण जिनावरून कितीवेळ योग्य-अयोग्याचा वाद घालत राहील आणि त्यातून नेमके काय साधेल याचा गंभीर पणे विचार करायला हवा. भारतातल्या राजकारणात जिनाना विरोध करून भारतीय राष्ट्रवाद वाढेल पण त्यामुळे आपण इतिहास बदलू शकत नाही. पण थोडासा गंभीर प्रयत्न केल्यास आपण फाळनीच्या इतिहसबाबत आपला दृष्टिकोन बदलू शकतो. आणि ह्या बदलामुळे आपल्याला भारत पाकिस्तान मधील संबंध सुधारण्यास मदत होईल.
भारतातल्या राजकीय नेतृत्वाला, आणि खासकरून राष्ट्रवादाचा पुरस्कार करणार्या पक्षांना फाळणीचा त्रयस्थ दृष्टीकोनातून अभ्यास करावा लागेल. असा विचार केल्यास निष्पक्ष निर्णय घेता येईल. दक्षिण अशियाचा आधुनिक इतिहास आपल्याला हाच निष्कर्ष दाखवतो की भारताची फाळणी म्हणजे अखंड भारताच्या नेतृत्वाच पराभव असून ब्रिटीश राज्यकर्त्यांचा " divide and quit" म्हणजे फोडा आणि वेगळे व्हा या राजकारणच विजय आहे आणि दक्षिण अशियातील स्वातंत्र सेनानी आणि नेतृत्वाच्या मुत्सददेगिरीचा पराभव आहे. आजूनही आपण फाळनीच्या सत्याचा स्वीकार करायला तयार नसलो तर भविष्यात अनेक वेळा आणि अनेक प्रकारे आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागेल. भारतातल्या पाकिस्तान बाबतच्या आक्रमक राजकारणामुळे पाकिस्तानच्या आतन्कवादी विचारधारेला पाठबळ मिळते आहे ही आजची वस्तुस्थिती आहे.
जो पर्यंत भारतातले नेतृत्व फाळणी एक भविष्यात दुरुस्त करण्यासारखी चूक होती असा विचार सोडत नाहीत तोपर्यंत भारताची कोणतीही कृती पाकिस्तानच्या राज्यकर्त्याना देशाच्या अस्तित्वावर संकतासारखी वाटेल. ज्याचा परिणाम म्हणजे तिथल्या सामाजिक प्रश्णाकडे दुर्लक्ष करून तिथली सरकारे भारतविरोधी प्रवृतीला जोपासतील. आणि पाकिस्तानातून सुरू होणारा आतन्कवाद भारताच्या आंतर्गत राजकारणात पाकिस्तान विरोधावर जिवन्त असलेल्या राजकारणाला खतपाणी देत राहील. एकमेकांना पूरक असलेल्या अशा राजकारणाचा विपरीत परिणाम म्हणजे कधी आतिरेकी हल्ला कधी युद्धजन्य स्थिती, कधी व्यापार आणि अर्थव्यवस्तेबाबत असहकार अशा स्वरुपात दिसतो. आणि एकमेकांशी सहकार्या करून दोन्ही देश जे फायदे घेऊ शकतात त्या पासून आपली गरीब जनता वंचित राहते. आक्रमक राष्ट्रवाद फक्त राजकारणाच्या आगीत तेल घालू शकतो पण गरीबी, भूक, महिलांवरील अत्याचार अशा अनेक समस्यांवर उपाय देऊ शकत नाही. दक्षिण अशिया उपखंडातील देश मनुष्य विकासाच्या बाबतीत अतिशय मागे आहेत आणि परस्पर सहकार्यकरून आपण पुढे जाऊ शकतो असा विचार दोनही देशातील राजकीय नेत्रुत्वाने केला पाहिजे.
त्रयस्थ विचार केल्यास जिना एक यशस्वी नेतृत्व होते असे वाटते. काहीही झाले तरी त्याना एक वेगळा देश मिळवण्यात यश आले होते. त्याची किंमत किती लागेल आणि त्याचा फायदा आणि नुकसान काय याचे जिनांचे गणित कदाचित चुकले असेल. पण जिना पाकिस्तानला एक सर्वधर्मसमभावी राष्ट्र म्हणून विकसित करणार होते याबाबत काही दुमत नसावे, त्यांचा पाकिस्तान निर्मिती नंतरचा लगेचचा मृत्यू पाकिस्तानसाठी आणि भारतासाठी दुर्दैवी आणि विघातक आक्रमक विचारसरणीसाठी पोषक परिस्थिती निर्माण करणारा ठरला आहे. आजचा विस्कळित स्थितीतला पाकिस्तान ही जिनांची चूक नसून त्यांच्या नंतर आलेल्या राज्यकर्त्यांचा पराभव आहे. आंबेडकरांनी भारताच्या राज्यघटनेचा विकास करण्यासाठी जे श्रम घेतले त्याचे फळ आज आपल्याला मिळते आहे. दुर्दैवाने पाकिस्तानच्या नशिबी आंबेडकरांसारखी दूरदृष्टी असलेला नेता लाभला नाही. जर आणि तर च्या विचाराने काही साद्ध्य होणार नाही पण पाकिस्तानी राष्ट्राच मूलभूत पायाच कच्चा असल्यामुळे एकमेकांवर विश्वास ठेऊन पुढचा विचार करणारे नेतृत्व तेथे कधीच तयार झाले नाही आणी जर झाले आर ते पाकिस्तानच्या राजकारणात टिकले नाही. आणि पाकिस्तानात एकदा सैनिकी राजवट आल्यावर सैनिकी आणि नागरिकी नेतृत्वामधे विश्वास संपला जो देखील आजपर्यंत निर्माण झालेला नाही आणि असे येत्या काही काळात होणाराही नाही हे पाकिस्तानचे आणखी एक कटू सत्य आहे.
विदेशात शिकलेले, देशातील प्रश्नांची जाणीव असलेले अखंड भारताचे नेतृत्व ब्रिटीश राजकारणाला बळी पडले होते. पण पुढचा विचार करून आजच्या भारताला जिनांच्या विचारातला पाकिस्तान आणि जिनांच्या नंतरचा पाकिस्तान या दोन गोष्टींमधला फरक लक्षात घ्यावा लागेल. भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी आणि ते चांगले ठेवण्यासाठी ही एक मोठी पायरी भारताच्या राजकीय नेतृत्वाला आणि पाकिस्तान अभ्यासकांना ओलंडावी लागेल. तरीही टाळी एक हाताने वाजत नाही म्हणूनच पाकिस्तानच्या राजकारण्याना भारताच्या अंतर्गत राजकारणातील प्रक्षोभाक विचारांकडे काणाडोळा करावा लागेल. याचबरोबर पाकिस्तानच्या राजकारणासाठी धर्मनिरपेक्षतेचे महत्त्व लक्षात घ्यावे लागेल आणि आक्रमी इस्लामी प्रवृतींवर नियंत्रण राखावे लागेल. भारत पाकिस्तानचे वाद इतर देशाना फायदेशीर ठरतात आणि दोन्ही देशांचे नुकसान करतात या वस्तुस्थितीचा देखील सगळ्यांना विचार करावा लागेल.
जर आत्ताचे भारतीय राजकारण जिनांचे राजकारण आणि त्यांच्या विचारसरणीच्या मजबूतीला कारणीभूत घटक समजू शकला आणि त्यांच्या बाबतीत नकारात्मक विचार सोडून इतिहासाची पुनाररावृत्ती टाळण्यासाठी आत्मचिंतन करू शकला तर ते भारताच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल कारण इतिहासाचा खरा धडा ऐतिहासिक चुका पुन्हा न होण्यात आहे.
Comments