साऊथ चीन समुदामध्ये व्हिएतनाम आणि ओएनजीसी विदेशच्या तेल संशोधन कार्यामुळे आपली स्वायत्तता भंग होत आहे, असा कांगावा चीनने सुरू केला आहे. धमकीवजा इशारेही दिले जात आहेत. परिणामी सुधारणेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारत-चीन संबंधांना पुन्हा नकारात्मक दिशा मिळण्याचा धोका दिसत आहे. ................ साऊथ चीन समुदामध्ये विएतनाम आणि ह्रहृत्नष्ट विदेशच्या तेल संशोधन आणि विकसन कार्यामुळे आपली स्वायत्तता भंग होत आहे, असा कांगावा चीनने सुरू केला आहे. त्याचप्रमाणे, चीनच्या Global Times या राष्ट्रवादी वर्तमानपत्राने, 'या क्षेत्रात कार्यरत होणाऱ्या अन्य पक्षांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा धमकीवजा इशारा असलेला लेख छापला आहे. ह्या सर्व गोष्टींमुळे सुधारणेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारत-चीन संबंधांना पुन्हा नकारात्मक दिशा मिळण्याचा धोका दिसत आहे. आजच्या परिस्थितीत भारत आणि चीन हे अतिशय वेगाने वाढणारे देश आहेत आणि त्यांचे द्विपक्षीय परस्परसंबंध अतिशय किचकट आहेत. जसजसे हे देश अधिक बळकट होतील, तसतसा त्यांच्यातल्या संपर्क हा साहजिकच वाढेल. बहुपक्षीय तसेच वैश्विक पातळीवर देखील त्...
perspectives, imaginations, dreams and ideas