पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ ते १६ मे असे तीन दिवस चीनचा दौरा केला. ह्या दौऱ्यात अनेक असे महत्वपूर्ण करार झाले ज्यामुळे भारत आणि चीन मधील आर्थिक संबंध मजबूत होतील. मोदींच्या दौऱ्यात भारत आणि चीनने एकूण २४ सामंजस्य कार्रंवार स्वाक्षऱ्या केल्या ज्याचे एकूण आर्थिक मूल्य २२०० करोड़ इतकी आहे. एकूणच चीन पुढच्या काही वर्षात इतकी गुंतवणूक भारतात करेल.
गेल्या एक वर्षात मोदी सरकारने एक सकारात्मक आणि क्रियाशील विदेशनीती अवलंबिली असून चीन, मंगोलिया आणि दक्षिण कोरियाचा दौरा ह्या नव्या विदेश नितिची उदाहरणे आहेत. ह्या अधि मोदिंनी नेपाल, भूटान, जापान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, श्रीलंका, मॉरिशस इत्यादि देशांना भेट दिली होती.
चीन हा भारतचा सर्वात शक्तिशाली शेजारी देश आहे आणि एक वैश्विक महासत्ता आहे. पण भारत चीन सम्बन्ध १९६२ च्या युद्धच्या सावलीतून अजूनही बाहेर आलेले नहित. तसेच सिमा रेशा वाद आणि अक्साई चीन आणि मैकमोहन लाइन विषयीचा वाद अजूनही पूर्णतः सुटलेला नही. तसेच दोन्ही देश सामरिक दृष्टया शक्तिशाली आहेत. त्यामुळे एकूणच सम्बन्ध गुंतागुंतीचे आणि बिकट आहेत.
चिनची बलाढ्य आर्थिक क्षमता अभूतपूर्व आहे आणि त्याचा जागतिक प्रभाव वाढणे स्वाभाविक आहे. पण चिनची सामरिक क्षमता आणि त्याचा भारताच्या सुरक्षेवर होणारा परिणाम चिंतेचा विषय आहे. तसेच भारताची अमेरिका, जापान ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांबरोबर वाढणारी जवळीक चीनला सतवते आहे. त्यामुळे राजकीय भेटी वाढवणे आणि सामंजस्य निर्माण करने दोन्ही देशांसाठी फायद्याचे आहे.
त्याच प्रमाणे भारताची वाढणारी अर्थव्यवस्था आणि चिनचा पैसा यांचा परस्पर पूरक मेळ होणे शक्य आहे. त्याच प्रमाणे, वैश्विक विषय जैसे, पर्यावरण बदल, व्यापर नियमन, विकसनशील देशांची सामायिक गरज ह्या विषयांवर दोन्ही देशांमध्ये जवळपास एकमत आहे. त्यामुळे विवादस्पद मुद्दे बाजूला ठेऊन सकारात्मक चर्चेला दोन्ही देश तैयार आहेत.
पंतप्रधान मोदींच्या चीन दौऱ्या आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा २६ जानेवारीला प्रमुख अतिथि म्हणून आले होते. त्यावेळी असे स्पष्ट झाले की अमेरिका आणि चीन मधल्या वादाचा आणि स्पर्धेचा फायदा करुन घेणे शेवटी भारताच्या हातात आहे. भारताचे भौगौलिक स्थान आणि आर्थिक विकासाची क्षमता आज जगासाठी आकर्षक आहे.
मोदींनी सप्टेम्बर २०१४ मध्ये चीनचे राष्ट्रपति क्षि जिनपिंग यांचे दिल्ली अगोदर अहमदाबाद मध्ये स्वागत करून एक नवा पायंडा पडला होत. यावेळी चीनने मोदींचे स्वागत क्षि यांच्या शीआन या शहरात करून चीन साठी नवी सुरुवात केली आहे. त्यानंतर मोदींनी बीजिंग मध्ये चिनचे पंतप्रधान ली कचिआंग यांच्या सोबत द्विपक्षीय चर्चा केली. सर्वत महत्वाचे म्हणजे मोदींनी केलेले वक्तव्य की "भारत चीन सम्बन्ध सुधरणे चीनच्या हातात आहे आणि चीनला आपल्या काही प्रार्थमिकतांचा पुनर्विचार करावा लागेल" जगभरातून नोंदले गेले होते. चीन विषयी नाराजगी असणे आणि त्याविषयी स्पष्टवक्तेपणा दाखवणे ह्या दोन वेगळ्या गोष्टि आहेत।
वैश्विकीकरणाच्या लाटेत अनेक देशांचे परस्परावलंबित्व वाढले आहे. पण भारत आणि चीनची आर्थिक देवाणघेवाण उथळ असून गेल्या कही वर्षात व्यापर संतुलन आणि गुंतवणूक वाढ यावर भर दिल जात आहे. राजकीय दुमत आणि अविश्वास कमी करण्यासाठी आर्थिक भागीदारी वाढवावी असा कल वैश्विकीकरणामुळे आला आहे. त्या दृष्टीने पंतप्रधान मोदींच्या चीन दौर्यानंतर भारत आणि चीन योग्य दिशेने पुढाकार करत आहेत असे म्हणणे म्हणणे योग्य ठरेल
लेखक अविनाश गोडबोले आणि गुंजन सिंह दिल्ली स्थित idsa मध्ये राष्ट्रिय सुरक्षा विषयक संशोधक आहेत. ह्या लेखातील मते वैयक्तिक आहेत.
Comments