Skip to main content


दहशतवादाचा चक्रव्यूह!


१३ जुलैच्या बॉम्बस्फोटांमुळेमहानगरी मुंबईला पुन्हा एकदाआतंकवादाचा सामना करावालागला आहे . या स्फोटांनीमोठ्या प्रमाणावर जीवितहानीकेली नसली तरीही लोकांमध्येभीती निर्माण केली आणिअनेकांच्या जुन्या जखमाजागवल्या . लोकांना कायमच२६ / ११सारख्या मोठ्याघटनांची भीती वाटत राहावी ,हेच छोट्या हल्ल्यांचे एक उद्दिष्टअसते . त्या दृष्टीने सरकार आणि सुरक्षा यंत्रणेचे लक्ष्य लोकांमधली सुरक्षिततेचीभावना मजबूत ठेवणे हे असले पाहिजे . म्हणूनच याक्षणी असा प्रश्न विचारावासावाटतो की २६ / ११नंतर आपले सरकार आणि सुरक्षा यंत्रणांनी असे काय केले , जेवेगळे आहे आणि ज्यामुळे नागरिकांना अधिक आश्वस्त वाटावे ?


राजकारणी गटाकडे उत्तरे नसतात , तेव्हा त्यांना दुसऱ्याच्या चुका काढण्यात स्वारस्यअसते . मुंबईचे दुर्भाग्य असे की अशा राजकारण्यांची इथे अजिबात कमी नाही !बॉम्बस्फोटाच्या आगीत प्रत्येकाने आपले हात शेकले आणि आपापले राजकारण पुढेरेटण्याचा प्रयत्न केला . कोणी बाहेरच्यांना दोष दिला तर कोणी दुसऱ्या पक्षाच्यामंत्र्यांना ! मुंबईच्या प्रतिकार क्षमतेला सगळ्यात मोठा धोका कोणता याचे उत्तरएकदम सोपे आहे आणि ते म्हणजे दिशाभूल करणारे राजकारण . खरे तर यामुळेमुंबईच्या सुरक्षेची कारणमीमांसा त्याच चक्रव्युहात फिरत राहते . त्यामुळे त्याचीपर्यायी मीमांसा होणे गरजेचे आहे . त्याचे मुख्य पैलू पुढीलप्रमाणे आहेतदृश्य आणि अदृश्य सुरक्षा यंत्रणा : सुरक्षा यंत्रणा दोन प्रकारची असते . एक प्रकार दृश्यसुरक्षा , जी हल्ला झाल्यानंतर काम करते , पण दुसरी सुरक्षा म्हणजे अदृश्य सुरक्षायंत्रणा . अनेकदा लोकांना आश्वस्त करण्यासाठी दृश्य सुरक्षा यंत्रणा मजबूत केली जाते, त्यामुळे जास्त पोलिस , चांगल्या बंदुकी , चांगल्या गाड्या यावर भर दिला जातो .पण त्यामुळे सुरक्षेची जाचकता वाढते आणि अतिकडक सुरक्षा देखील भीतिदायक ठरते. तसेच दृश्य सुरक्षा फक्त हल्ल्यानंतर काम करू शकते . सुरक्षा व्यवस्थेचे मुख्य लक्ष्यदहशतवादी हल्ले टाळणे हे असते . त्यासाठी अदृश्य सुरक्षा यंत्रणा सुदृढ करण्याचीगरज आहे . साध्या वेशातील पोलिस आणि खबरी यंत्रणांची गरज आहे . अशा यंत्रणा, ज्या घटनेची माहिती नियोजनाच्या पातळीवरच बाहेर काढू शकतील आणि त्यामुळेघटना टाळणे शक्य होईल .प्रोत्साहित पोलिस दल : हवालदार आणि उपनिरीक्षक पातळीवरच्या दलाचा सहभागव समन्वय वाढवणे आणि नागरिक दक्षता कार्यक्रमांचे नियोजन करणे गरजेचे आहे .हवालदार म्हणजे पोलिस यंत्रणेचे कान आणि डोळे असतात असे अनेकवेळा म्हणालेजाते , पण त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याची , तसेच त्यांचीनिर्णयक्षमता वाढविण्याची गरज आहे . तळच्या पातळीवरील पोलिस कधी प्रोत्साहितहोतील ? त्यांचे अधिकारी कार्यक्षम असतील , तर . त्यामुळे कार्यक्षम अधिकाऱ्यांनाप्रोत्साहन देणे आणि पोलिस दलाच्या नेमणुका व बढत्या यांतील भ्रष्टाचार मिटवणे हीराज्य सरकारची अतिशय महत्त्वाची जबाबदारी आहे . जागरूक जनतेने फक्तबॉम्बस्फोटानंतर जाब विचारण्याऐवजी , या नियमित कामाकडे लक्ष ठेवले पाहिजे .त्यामुळे सरकार आणि यंत्रणा सजग व उत्तरदायी राहील .सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पोलिस यंत्रणेचा विस्तार आणि विभाजन . मुंबई पोलिसएकाच वेळी अनेक दगडांवर पाय ठेवून आहे . पोलिस दलाने ताण आहे असे म्हटल्यास, ती अकार्यक्षमता दाखविणाारी सबब न मानता त्याचा गांभीर्याने विचार व्हायलाहवा व त्यावर ठोस उपाययोजना व्हायला हवी . मुंबई पोलिस एकाच वेळीअतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा , सण - उत्सवांची सुरक्षा , महत्त्वाच्या जागांचीसुरक्षा , नैसर्गिक आपत्ती निवारण आणि एकंदर कायदा आणि सुव्यवस्था अशा अनेकगोष्टींकडे लक्ष देत असतात . त्यामुळे अधिक प्रभावी कामासाठी या दलाचेविकंेद्रीकरण किंवा विभाजन गरजेचे आहे का , याचाही विचार गांभीर्याने केलापाहिजे . सार्वजनिक कार्यक्त्रम आणि राजकीय सभा हा संवेदनशील विषय आहे , पणआपली जीवनपद्धती आपल्याला असलेल्या धोक्यांमुळे बदलावी लागेल का , याचाहीविचार करण्याची गरज आहे . त्यामुळे आपली सुरक्षितता अधिक वाढणार असेल तरआपण अशा बदलास , राजकारण न करता , एकमताने तयार व्हायला हवे .२६ / ११ नंतर सागरी सुरक्षिततेसाठी बोटी आणल्या , पण त्यांच्या वापराचे नियोजननसल्याने त्या पडून आहेत . तसेच आताही कंट्रोल रूम आणि नियोजनाबाबत काहीनिर्णय घेतलेले आहेत . अस्तित्वात असलेल्या यंत्रणेत नव्या निर्णयांचा समावेश कसाकरायचा याची दूरदृष्टी आपल्याकडे नसेल तर अशा घोषणांचा काडीचाही उपयोगनाही आणि दूरदृष्टीशिवाय नव्या घटनांमधून काही शिकताही येणार नाही . त्यामुळेसर्वांगीण विचार करून निर्णय घेतले तर जनतेचा पैसा आणि सरकार व पोलिसांचावेळ वाया जाणार नाही .१३ / ०७च्या संदर्भात प्रसारमाध्यमांची भूमिका हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे .२६ जुलैला मुंबईतील बहुतेक सगळ्या वर्तमानपत्रांनी मुखपृष्ठांवर मृत अथवा जखमीलोकांची छायाचित्रे छापली होती . विदारकता आणि संवेदनशीलता यातीलसमतोलाचे गांभीर्य विसरता नये . एकूणच दहशतवादी हल्ल्यांचे लक्ष्य मृतांच्याआकड्यांपेक्षा जिवंत लोकांच्या मानसिकतेला धक्का पोचवणे हे असते . पुढच्या हल्ल्यातअशी अवस्था माझी तर होणार नाही ना , असा प्रश्न जनसामान्यांना अशी छायाचित्रेबघून पडतो . मग प्रसारमाध्यमे लोकांची संवेदनशीलता व्यक्त करणार की भडक फोटोदाखवून अतिरेक्यांना मदत करणार हा निर्णय घेण्याची गरज आहे .खरे सांगायचे तर वर मांडलेल्या साऱ्या गोष्टी एकमेकांशी निगडित आहेत . राष्ट्रीयसुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्यातली साखळी ओळखणे आणि राजकारण , समाजकारण आणिसर्वव्यापी सुरक्षा यातला संबंध मजबूत करणे हा एकच दूरगामी उपाय दहशतवादाला संपवू शकेल . 


my article in today's Maharashtra Times

Comments

Popular posts from this blog

Singapore Summit and China’s Strategic Assumptions in East Asia

Thus it appears as if after pulling out a credible Iran deal, one which has enough checks and balances as well as involvement of other like-minded countries, The US President   Donald Trump gave away a lot in Singapore in return little verifiable in return from Kim. It appears as if North Korea, a de-facto nuclear power, is the bigger winner out of the Singapore summit. Donald Trump did have his moment of unilateral glory in Singapore but if Japan and South Korea came out on top, then they would have more reasons to worry. Moreover, China’s headaches would rise were they to act on those worries. Until the Singapore summit, Donald Trump and Kim Jong un had fairly same reasons for direct talks. For Trump it was his desire to stamp the American supremacy. He sought to show China its place, after years of engagement policy by Obama by first completely discrediting the Six Party talks which were not only China-initiated but also China-led. He used social media on one...

पंतप्रधान मोदींचा चीन दौरा, कारणे आणि निष्कर्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ ते १६ मे असे तीन दिवस चीनचा दौरा केला. ह्या दौऱ्यात अनेक असे महत्वपूर्ण करार झाले ज्यामुळे भारत आणि चीन मधील आर्थिक संबंध मजबूत होतील.  मोदींच्या दौऱ्यात भारत आणि चीनने एकूण २४ सामंजस्य कार्रंवार स्वाक्षऱ्या केल्या ज्याचे एकूण आर्थिक मूल्य २२०० करोड़ इतकी आहे. एकूणच चीन पुढच्या काही वर्षात इतकी गुंतवणूक भारतात करेल. गेल्या एक वर्षात मोदी सरकारने एक सकारात्मक आणि क्रियाशील विदेशनीती अवलंबिली असून चीन, मंगोलिया आणि दक्षिण कोरियाचा दौरा ह्या नव्या विदेश नितिची उदाहरणे आहेत. ह्या अधि मोदिंनी  नेपाल, भूटान, जापान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, श्रीलंका, मॉरिशस इत्यादि देशांना भेट दिली होती.   चीन हा भारतचा सर्वात शक्तिशाली शेजारी देश आहे आणि एक वैश्विक महासत्ता आहे . पण भारत चीन सम्बन्ध १९६२ च्या युद्धच्या सावलीतून अजूनही बाहेर आलेले नहित. तसेच सिमा रेशा वाद आणि अक्साई चीन आणि मैकमोहन लाइन विषयीचा वाद अजूनही पूर्णतः सुटलेला नही. तसेच दोन्ही देश सामरिक दृष्टया शक्तिशाली आहेत. त्यामुळे एकूणच सम्बन्ध गुंतागुं...
Why Blame China? We are a House Divided One of the articles published in the Chinese Institute for International and Strategic Studies has talked of the ease with which India can be divided into 20-30 parts in the future to prevent the country from rising as a strategic rival for the top spot in Asia and in the world. This article has invoked a lot of heat and debate in India. This was expected given the fact that China is India’s rival and a strategic adversary in most of the situations. It is also somewhat surprising given the norms governing international relations that no one speaks so blatantly of dividing the neighbour, even if one so desired, more so if you take pride in your ‘peaceful rise’ in international relations. Moreover, the policy of beggar thy neighbour is simply dated in the era of economic cooperation and nuclear weapons. Even as the analysts in India get angry about the perception of certain Chinese scholar about India, they must not lose sight of the fact that the ...