भारतासह ब्राझील, रशिया आणि चीनचा समावेश असलेल्या ‘ब्रिक्स’ गटाची परिषद आजपासून नवी दिल्लीत सुरू होते आहे. ही परिषद महत्त्वाची आहे का, आणि त्यातून काय साधणार, याबद्दल एका अभ्यासकाची ही निरीक्षणे..
ब्राझील, रशिया, भारत आणि चीन या चार देशांच्या ‘ब्रिक्स’ या गटाची चौथी शिखर परिषद आता नवी दिल्लीत होत आहे. भारतात अशी परिषद प्रथमच होत असली तरी केवळ तेवढय़ाचेच अप्रूप नाही. चीनमधील सन्या शहरात गेल्या वर्षी झालेल्या शिखर परिषदेत ‘ब्रिक्स’चे वाढते महत्त्व दिसून आले आहे आणि बहुसांस्कृतिक (निव्वळ पाश्चात्त्यांचे वर्चस्व मानणे इतिहासजमा झाल्यानंतरच्या) जगातील एक महत्त्वाचा गट ही ‘ब्रिक्स’ची ओळख यापुढेही वाढत जाणार, हेही स्पष्ट झाले आहे. अशा राष्ट्र-गटांना अनेकदा त्यांच्या भू-राजकीय भूमिकांमुळे महत्त्व असते, तसे तर ‘ब्रिक्स’ला आहेच; परंतु जगातील बदलत्या आर्थिक स्थितीमुळे / वातावरणामुळे ‘ब्रिक्स’ देशांचे महत्त्व वाढले आणि वाढणार आहे.
Summary of my article published in Loksatta on 26 March 2012. The complete article is available here.

Comments